माजी कोळसा सचिव गुप्तांसह पाचजणांना तुरुंगवासाची शिक्षा

16

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

कोट्यवधी रुपयांच्या कोळसा खाणवाटप घोटाळा प्रकरणातील आणखी एका खटल्याचा निकाल बुधवारी विशेष न्यायालयाने जाहीर केला. पश्चिम बंगालमधील कोळसावाटप गैरव्यवहार प्रकरणात माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्ता, के. एस. क्रोफा आणि के. सी. सामरिया या अन्य दोन सनदी नोकरशहांसह पाचजणांना न्यायालयाने तीन ते चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय पाचजणांना जबरी दंडही ठोठावला आहे.

यूपीए 1 आणि यूपीए 2 सरकारच्या काळातील कोळसा खाणवाटप गैरव्यवहार प्रकरणाचे 40 गुन्हे सीबीआयने तपासून आरोपपत्रे दाखल केली आहेत. त्यापैकी पश्चिम बंगालमधील मोईरा आणि मधुजोरे (उत्तर आणि दक्षिण) या क्षेत्रातील कोळसा खाणी विकाश मेटल्स ऍण्ड पॉवर लिमिटेड कंपनीला बेकायदा देण्याच्या प्रकरणाचा निकाल आज विशेष न्यायमूर्ती भारत पराशर यांनी घोषित केला. न्यायालयाने निकाल घोषित केल्यावर सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या