कश्मीरात तीन जवान शहीद

57

सामना ऑनलाईन । श्रीनगर

कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचे हल्ले सुरूच असून पुलवामा जिह्यात चकमकीत दोन जवान शहिद झाले. तर सिमेवर पाकड्यांनी केलेल्या गोळीबारात एक जवान शहिद झाला आहे.

पुलवामात सांभोरा परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. सीआरपीएफच्या जवानांनी ‘ऑपरेशन’ सुरू केले. यावेळी चकमकीत दोन जवान शहिद झाले. जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देत एका दहशतवाद्याचा खात्मा केला. सांबा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सिमेवर पाकिस्तानी रेजर्सने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकच्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान तपन मोंडाल हे शहिद झाले.

आपली प्रतिक्रिया द्या