बिहारमध्ये चहा पिणं बेतलं जीवावर, तीन जणांचा मृत्यू

31
रिकाम्या पोटी चहा कधीच प्यायचा नाही. कारण चहामध्ये ऍसिड भरपूर प्रमाणात असल्याने पोटात जळजळ होऊ शकते.

सामना ऑनलाईन । पटना

बिहारच्या सारण जिल्ह्यामध्ये विषारी चहा प्यायल्याने तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका लहान मुलालाही हा चहा प्यायल्याने विषबाधा झाली असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खिरकिया या गावामध्ये योगेंद्र राय राहतात. त्यांच्या पत्नी रामकलिया देवी यांनी चहा बनवला होता. त्याचवेळी रामकलिया यांनी चहा बनवण्यासाठी चहा पावडर टाकण्याऐवजी चुकून कीटकनाशक चहामध्ये टाकलं.

चहा प्यायल्यानंतर घरामध्ये असलेल्या चारही व्यक्तींची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तीन जणांचा मृत्यू झाला. रामकलिया देवी (६५), त्यांच्या शेजारी राहत असलेल्या छठिया देवी (६०) आणि रामकलिया यांचा नातू अंकूर कुमार या तिघांचा यामध्ये मृत्यू झाला आहे.
तसेच यामध्ये १२ वर्षांच्या एका मुलालाही कीटकनाशकाची विषबाधा झाली आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत याहेत.

आपली प्रतिक्रिया द्या