छत्तीसगडमधून ३ नक्षलवाद्यांना अटक

सामना ऑनलाईन । रायपूर

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात पोलिसांनी तीन नक्षलवाद्यांना अटक केले आहे. माधवी देवा (३०) आणि हेमला जोग (२५) या दोन नक्षलवाद्यांना चिंतालनार पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर मुचाकी मुन्ना (२८) या नक्षलवाद्याला चिंतागुफा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अटक करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक जितेंद्र शुक्ला यांनी दिली.

जिल्हा रिझर्व्ह गार्ड (डीआरजी), स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त पथकाने नक्षलवाद्यांना अटक केले. अटक केलेल्या नक्षलवाद्यांची दंतेवाडा येथील स्थानिक न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

देवा आणि जोगा या नक्षलवाद्यांवर पोलिसांवर गोळीबार केल्याचा आरोप आहे तर मुन्नावर पोलिसांना लक्ष्य करुन स्फोट केल्याचा आरोप आहे.

आपली प्रतिक्रिया द्या