मराठा आरक्षणासाठी बीड, नवी मुंबईत तीन तरुणांच्या आत्महत्या

26
शरद पवार – 1) 18 जुलै, 1978 ते 17 फेब्रुवारी, 1980 (पुलोद), 2) 26 जून, 1988 ते 25 जून 1991 (काँग्रेस), 3) 6 मार्च, 1993 ते 14 मार्च, 1995 (काँग्रेस)

सामना ऑनलाईन । मुंबई

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज जिल्हय़ात दोन तरुणांनी आत्महत्या केली. पिंपळनेर येथील शिवाजी तुकाराम काटे यांनी ‘मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाचा अंत पाहू नये, आरक्षण द्यावे एवढीच अंतिम इच्छा’अशी चिठ्ठी लिहून ठेवत गळफास घेतला. तर डोंगरकिन्ही येथील कानिफ दत्तात्रय येवले यांनीही मराठा आरक्षणासाठी विष घेतले.

पिंपळनेर येथील शिकाजी तुकाराम काटे (४२) हे बेडुककाडी शिकारातील शेतकस्तीकर राहत होते. शुक्रकारी रात्री लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी शर्टाच्या खिशात मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली. पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही येथील कानिफ दत्तात्रय येवले (४२) यांनी मराठा आरक्षणासाठी विष घेतले. येवले यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

तुर्भेमध्ये अरुण भडाळेने मृत्यूला कवटाळले
नवी मुंबई : मराठा आरक्षणासाठी अरुण जगन्नाथ भडाळे (२५) या तरुणाने आज सकाळी रहात्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार तुर्भे गावात घडला. कर्जबाजारीपणामुळे तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आत्महत्या करत असल्याचे अरुण भडाळे याने आत्महत्येपुर्वी लिहीलेल्या चिठ्ठीमध्ये लिहिले आहे. अरुण भडाळे हा तुर्भे सेक्टर-२० मध्ये मित्रांसह रहाण्यास होता. तसेच तो एपीएमसीतील दाणा मार्केटमध्ये माथाडी कामगार म्हणून काम करत होता. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास त्याच्यासोबत असलेले सहकारी उठल्यांनतर त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. घटनास्थळी केलेल्या तपासणीत अरुणने मृत्यूपुर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली नाही. मात्र भडाळे याच्या कोपरखैरणे येथे रहाणाऱया आत्येभावाने दुपारी पोलिसांना सदरची चिठ्ठी आणून दिली.

आंदोलकांना एकटे पाडण्याचा राज्यकर्त्यांचा उद्देश आहे का?
पुणे : मराठा आरक्षणातील निर्णय घेताना राज्यघटनेने इतर समाजांना दिलेल्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. मात्र, राज्य सरकार याबाबत निर्णय घेण्यासाठी तयार नाही. या उलट आंदोलने अधिक होऊन कटुता कशी काढेल, आंदोलकांना एकटे पाडून इतरांना संघटित करून त्याचा राजकीय फायदा घ्याका, असा राज्यकर्त्यांचा उद्देश आहे काय ? याबाबत सरकारची भूमिका स्कच्छ दिसत नाही, असे स्पष्ट मत माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. पुण्यात एका पुस्तक प्रकाशन समारंभामध्ये पवार बोलत होते.

धनगर आरक्षणासाठी पैठणमध्ये युवकाने गळफास घेतला
पैठण : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्यांचे सत्र सुरू असतानाच धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठी तरुणाने गळफास घेतल्याने एकच खळबळ उडाली. पैठण तालुक्यातील बालानगर येथील परमेश्वर बबन घोगडे (२२) याला पुणे येथे झालेल्या धनगर आरक्षण मेळाव्यासाठी जायचे होते. परंतु घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तो जाऊ शकला नाही. आरक्षण मेळाव्यास जात आले नाही याचे शल्य बोचत असल्याने परमेश्वर याने शुक्रवारी शेतात गळफास घेतला. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने धनगर समाजास आरक्षण मिळावे यासाठी आपण आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी खिशात लिहून ठेवली. घटनेची माहिती मिळताच धनगर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परमेश्वरच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.

९ ऑगस्टच्या आंदोलनास या!
लातूर : मराठा क्रांतीच्या वतीने ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ठिय्या आंदोलनात मराठा समाजातील आमदार- खासदारांनी सहभागी व्हावे अन्यथा त्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज येथे देण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या निवासस्थानासमोर आज ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी घंटानादही करण्यात आला.

 

आपली प्रतिक्रिया द्या