आईला शिवीगाळ केल्याने केला खून, तीन आरोपींना अटक

प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । जालना

जालना शहरातील खांडसरी येथे किरकोळ कारणावरून 3 जणांनी केलेल्या मारहाणीत सय्यद शफिक सयद इसाक (35) याचा मृत्यू झाला. ही घटना सोवमरी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी तिघांविरूध्द सदर बाजार ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंद करण्यात येवून त्यांना अटक करण्यात आली.

शहरातील खांडसरीत मयत सय्यद शफीक याने संदीप जाधव यांच्या आईस शिवीगाळ केली. या कारणावरून सय्यद शफीक यास संदीप जाधव, त्याचा मामा व इतर 2 जणांनी लोखंडी गजाने मारहाण केली. त्यात सय्यद शफीक गंभीर जखमी झाले होते. दरम्यान उपचारादरम्यान स. शफीक याचा मृत्यू झाला. याबाबत आज १८ जून रोजी सदर बाजार ठाण्यात मयत स. शफीक याचा भाऊ सयद अतिकसयद इसाक याच्या फिर्यादीवरून संदिप शंकर जाधव व त्याचे सोबत त्याचे मामा, श्रावण ऊर्फपिंट्या सिताराम काळे, बबन सिताराम काळे सर्व रा. खांडसरी जालना यांच्याविरूध्द खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. श्रावण काळे यास रेल्वे स्टेशन जालना येथे, संदीप जाधव यास कारला रेल्वे स्टेशन तर बबन काळे यास रेल्वे पुलाच्या खाली बायपासजवळ
पोलिसांनी पकडले.