श्री अराकेश्वरा मंदिरात तीन पुजाऱ्यांची दगडाने ठेचून हत्या!

murder

कर्नाटकातील प्रसिद्ध श्री अराकेश्वरा मंदिराच्या प्रांगणात तीन पुजाऱ्यांची दगडांनी ठेचून अत्यंत  क्रूरपणे हत्या करणार आली आहे. शुक्रवारी सकाळी पुजाऱ्यांचे मृतदेह आढळले. मंडय़ा शहरातील गुट्टालू येथे हे प्राचीन मंदिर आहे. या हत्याकांडाने खळबळ माजली आहे.

गणेश, प्रकाश आणि आनंद या मृत पुजाऱ्यांची नावे आहेत. तिघे चुलत भाऊ आहेत. सकाळी मंदिराचा दरवाजा उघडा होता. गावकऱ्यांनी आत जाऊन पहिले असता तिघांचे मृतदेह रक्तांच्या थारोळयात पडलेले होते. दगडाने ठेचून त्यांची हत्या करण्यात आल्याचे दिसत होते. गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या भयंकर हत्याकांडामुळे भक्तांमध्ये संतापाची लाट उसळली. मोठय़ा संख्येने नागरिक मंदिर परिसरात जमा झाले. दरम्यान आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

दानपेटीतील नोटा नेल्या; नाणी ठेवली

तीन पुजाऱ्यांची झोपेतच दगडांनी ठेचून हत्या केली. दरोडय़ाचा उद्देशाने हे हत्याकांड झाले असावे असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दरोडेखोरांनी मंदिरातील दानपेटय़ा फोडल्या. त्यातील नोटा नेल्या मात्र नाणी तशीच ठेवली आहेत असे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या