जम्मू-कश्मीरच्या सोपोरमध्ये ३ दहशतवाद्यांचा खात्मा

26

सामना ऑनलाईन । जम्मू-कश्मीर

कश्मीरच्या सोपोरमध्ये सीआरपीएफचे जवान आणि जम्मू-कश्मीर पोलिसांना ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं आहे. हे तीनही दहशतवादी ‘लष्कर-ए-तोयबा’चे असल्याची माहिती समोर आली आहे. या दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठीही जप्त करण्यात आला आहे. चकमकीत हिंदुस्थानचा एक जवानही जखमी झाला आहे.

कश्मीरच्या सोपोर येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर शनिवारी पहाटे सीआरपीएफची १७९ बटालियन, ५२ राष्ट्रीय रायफल दल आणि पोलीस यांनी एकत्रितरित्या शोधमोहिम सुरू केली. यादरम्यान दोन्ही बाजूंनी झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना सुरक्षा यंत्रणांनी ठार केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या