जम्मूत ३ दहशतवाद्यांना अटक, दोघांचा शोध सुरू

सामना ऑनलाईन । जम्मू-कश्मीर
जम्मू-कश्मीरमध्ये हिंदुस्थानी लष्कर आणि पोलिसांनी संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत तीन दहशतवाद्यांना पकडण्यात यश आलं आहे. तीन पैकी एक दहशतवादी जखमी असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जम्मू कश्मीरचे आयजी मुनीर खान यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली. हलनकुंड समवेत राज्यातील इतर परिसरात १४ नोव्हेंबरपासून ही कारवाई सुरू आहे. या ऑपरेशनच्या सुरुवातीला लष्कराचा एक जवान शहीद झाला होता.
अट्टा मोहम्मद मलिक, शम्स उल वकार आणि बिलाल शेख असं अटक करण्यात आलेल्या तीन दहशतवाद्यांची नावं आहेत. अट्टा मलिक याला जखमी अवस्थेत पकडण्यात आलं आहे. आणखी दोन दहशतवादी या परिसरात लपले असल्याची शक्यता मुनीर खान यांनी वर्तविली आहे; त्यामुळे ऑपरेशन अद्याप सुरू आहे.
मुनीर खान यांनी सांगितलं की, ‘गेल्या ४ महिन्यात १६ कश्मिरी युवक दहशतवादी संघटनांशी जोडले गेले आहेत. पाकिस्तानकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांची दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे. युवकांना दहशतवादी संघटनांशी जोडण्यासाठी आमिष दिलं जात आहे.’
आपली प्रतिक्रिया द्या