सोने खरेदीच्या बहाण्याने 80 हजारांची चेन लांबवली

प्रातिनिधिक फोटो

सोने खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्समध्ये आलेल्या तीन बुरखाधारी महिलांनी 80 हजारांची सोनसाखळी चोरून नेली. ही घटना कॅम्प परिसरातील दागिना ज्वेलर्स दुकानामध्ये घडली. याप्रकरणी हर्ष मेहता (वय 29, रा. सॅलेसबरी पार्क) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्ष यांचा सोने-चांदी विक्रीचा व्यवसाय असून कॅम्पमध्ये त्यांचे दागिना ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. तीन दिवसांपूर्वी दुपारी दीडच्या सुमारास तीन बुरखाधारी महिला सोने खरेदीच्या बहाण्याने त्यांच्या दुकानामध्ये आल्या होत्या.

त्यावेळी त्यांनी हर्ष यांच्या वडिलांचे लक्ष विचलित करून दुकानातील 80 हजार रूपये किंमतीची सोन्याची चेन चोरून नेली आहे.  याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक शिळमकर तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या