तळोजा येथील गौसिया मच्छी कंपनीत तीन कामगारांचा मृत्यू

सामना ऑनलाईन । पनवेल
तळोजा औद्योगिक विभागातील एका मच्छी कंपनीत तीन कामगारांचा पाण्याच्या टाकीत पडुन मृत्यु झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. तळोजा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक रविद्र बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक एम जी शेडगे या घटनेचा तपास करीत आहेत.
या औद्योगिक विभागातील कामगारांची सुरक्षा व्यवस्था चव्हाट्यावर आली असून आगीच्या प्रकाराना आळा बसला ना बसतोच कारखान्यातील कामगारांचे मत्युचे प्रकार बाहेर येत आहेत. प्लॉट नंबर एम ७ गौसिया कोल्ड स्टोरेज या मच्छी कंपनीत १०० च्या वर कामगार काम करत आहेत. या कंपनीत कनैया परशुराम महतो (२२), रहीम मादर गाझी (३८), मनोज डिसो मुड्डा (२६) हे कामगार करत असताना यातील अनुक्रमे दोन कामगार कोल्ड स्टोअरच्या पाण्याच्या टाकीत पडले. शॉक सर्किट झाल्याने पाण्याच्या टाकीला शॉक बसत होता. परिणामी ते कामगार बाहेर पडू शकले नाहीत. मनोज मुड्डा याला टाकीतील पाण्याला शॉक सर्किटमुळे शाँक लागत आहे हे माहित नसल्याने त्याने मदतीसाठी उडी टाकली. या कारखान्यात कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने या अपघातात तिन्ही कामगारांचा तडफडून मृत्यु झाला.
आपली प्रतिक्रिया द्या