गॅस सिलेंडरच्या स्फोटात तीन वर्षीय बालकाचा होरपळून मृत्यु

19
प्रतिकात्मक छायाचित्र


सामना ऑनलाईन । लखनौ

उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात शुक्रवारी घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन तीन वर्षाच्या एका लहानग्याचा होरपळून मृत्यु झाला आहे. उत्तर प्रदेशातील बरखेडा गावात ही घटना घडली आहे.

या दुर्घटनेत इतर पाच जण गंभीर जखमी झाले होते. मृत मुलाचे नाव आकाश असून त्याचे वय अवघे 3 वर्ष होते. जखमी व्यक्तींना तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती पोलीसांनी दिली. तसेच हा स्फोट नेमका कशामुळे झाल्या याचे कारण अस्पष्ट आहे याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या