जीप उलटून तिघांचा मृत्यू

तुळजापूरला निघालेल्या भाविकांच्या जीपला अपघात होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. मृत आणि जखमी भाविक नाशिक जिह्यातील सिन्नर तालुक्याचे रहिवासी आहेत.

निखिल रामदास सानप, अनिकेत बाळासाहेब भाबड, अथर्व शशिकांत खैरनार (सर्व रा. चास, ता. सिन्नर, जि. नाशिक) अशी मृतांची नावे आहेत.

निखिल सानप, अनिकेत भाबड, अथर्व खैरनार आणि जखमी भाविक गणेश खैरनार, पंकज रवींद्र खैरनार, जीवन सुदीप ढाकणे, तुषार बीडकर, दीपक बीडकर हे बोलेरो जीपमधून तुळजापूर येथे देवदर्शनासाठी निघाले होते. सोलापूर-तुळजापूर मार्गावर असलेल्या तामलवाडीजवळ जीपचे अचानक टायर फुटल्याने ती दोन ते तीन वेळा उलटून आदळली.  यात निखिल, अनिकेत आणि अथर्वचा जागीच मृत्यू झाला.