कारागृहांतील बंदीवानांचे अर्धवट शिक्षण होणार पूर्ण; यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व कारागृह विभागात नव्याने सामंजस्य करार

कारागृहातून सुटल्यानंतर बंदीवान पुन्हा गुन्हेगारी क्षेत्राकडे न वळता, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बंद्यांकरिता कारागृह विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यासाठी प्राधान्य दिले आहे. विशेषतः बंदीवानांना त्याचे अर्धवट शिक्षण पूर्ण करण्यासाठी कारागृहातच बंद्यांना उच्च शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक व महाराष्ट्र कारागृह विभाग यांच्यात 2017 मध्ये सामंजस्य करार केला होता. संबंधित करार नव्याने करण्यात आला आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून राज्यातील 2 हजार 999 पुरुष बंदी व 207 महिला अशा मिळून २ हजार 856 बंद्यांनी पदवी पूर्व परीक्षा, पदविका व पदवीचे शिक्षण प्राप्त केले आहे.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून कारागृहातील बंद्यांना देण्यात येणाऱ्या शिक्षणाची गंगा अविरत सुरू राहावी, या उद्देशाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे व महाराष्ट्र कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक प्रशांत बुरडे यांच्यामध्ये नव्याने बंदी शिक्षणाकरिता सामंजस्य करार केला आहे. करारामुळे शिक्षक दिनाचे औचित्य साधून कारागृहातील बंद्यांना देण्यात येणाऱ्या शिक्षणाची गंगा अविरत सुरू राहावी, या उद्देशाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे व महाराष्ट्र कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक प्रशांत बुरडे यांच्यामध्ये नव्याने बंदी शिक्षणाकरिता सामंजस्य करार केला आहे. करारामुळे राज्यातील सर्व कारागृहांतील जास्तीत जास्त बंद्यांना उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहित केले जाणार आहे.

कारागृहात राहुन मुक्त विद्यापीठामार्फत पदवीचे शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या बंद्यांना 90 दिवसांपर्यंत माफी (शिक्षेत सूट) देण्यात येत असून, आतापर्यंत 214 बंद्यांना 90 दिवस माफीचा लाभ देण्यात आला आहे व या पदवीधर बंद्यांपैकी एकूण 16 बंद्यांनी उच्च पदवी शिक्षणक्रम पूर्ण केल्याने त्यांना पुन्हा 90 दिवसांची माफी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत येरवडा, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, मुंबई, तळोजा, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या मध्यवर्ती कारागृह व कल्याण जिल्हा कारागृह अशा एकूण 10 कारागृहांत विद्यापीठाची अभ्यासकेंद्रे आहेत. शैक्षणिक अभ्यासक्रमात मुख्यतः पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम व आरोग्यमित्र,योगशिक्षक, बालसंगोपन आणि रंजन शिक्षण, मानवी हक्क, गांधी विचार दर्शन यांसारख्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा समावेश केला आहे. शिक्षणामुळे कारागृहातील बंद्यांना तुरुंगातून मुक्त झाल्यानंतर चांगले जीवन जगण्याची संधी मिळते. सामंजस्य करारावेळी प्रशांत बुरडे, विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, डॉ. विश्वास गायकवाड, येरवडा कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ, अतिरिक्त अधीक्षक पल्लवी कदम, उपअधीक्षक भाईदास ढोले, रवींद्र गायकवाड, श्रीकांत जावरकर, वरिष्ठ तुरुंगाधिकारी सोमनाथ पाडुळे उपस्थित होते.