फेशियलच्या नावाखाली घर साफ करणाऱ्या महिलेला अटक

सामना ऑनलाईन, विनोद पवार

घरी फेशियलच्या बहाण्याने महिलांच्या चेहऱ्याला वेगवेगळे पॅक लावून त्यांना गुंग करत घर साफ करणाऱ्या महिलेला पिंपरीजवळ सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. कविता ढोरे (वय-४५ वर्ष) असं या महिलेचं नाव आहे.  रेखा कोळेकर यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

रेखा कोळेकर यांच्या घरातून कविता ढोरे हीने २५ जानेवारीला दुपारी तीन वाजता ५ लाख ३९ हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले होते. याबाबत कोळेकर यांनी पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी कोळेकर यांच्याकडे दिवसभरात कोणाशी भेटलात कोणाकडे गेला होतात, याची चौकशी केली. कविता ढोरे यांना भेटले असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी कविता ढोरे यांच्याकडे चौकशी केली असता ती उडवाउडवीची उत्तरे देत होती. त्यामुळे पोलिसांचा तिच्यावर संशय बळावला. तिच्या घराची झडती घेतली असता घरामध्ये ७७ ग्रॅम वजनाचे दागिने मिळून आले तसेच तिच्या घराच्या टेरेसवरही दागिने सापडले.

कविता ढोरे दोन पद्धतीने चोऱ्या करत होती. फेशियलच्या बहाण्याने घरात घुसून चोरी करणे आणि दुसरा प्रकार होता तो म्हणजे कुलुपविक्रीचा धंदा.ती ज्या महिलांना कुलुप विकायची त्या कुलुपाची एक चावी ती स्वत:कडे ठेवत होती. त्या महिलांशी जवळीक साधून त्यांना स्वत:च्या घरी चहा प्यायला किंवा जेवायला बोलवायची. आणि त्या महिला घरी आल्यानंतर बाहेर जाऊन येते असं सांगून त्यांच्या घरात चोरी करायची

आपली प्रतिक्रिया द्या