टिक टॉक बॅन मुळे कोट्यवधींचे नुकसान, 250 जणांच्या नोकर्‍यांवर गंडातर

189
tiktok-f

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानमधील लोकप्रिय ऍप टिक टॉकचे निर्माते चीनचे आहेत. टिक टॉकमुळे कंपनीला साडे तीन कोटींचे नुकसान होत आहे, तसेच 250 जणांच्या नोकर्‍या जाऊ शकतात अशी माहिती कंपनीने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे.

हिंदुस्थानमध्ये टिक टॉक हे खुप लोकप्रिय ऍप होते. परंतु या ऍपमुळे अश्लील व्हिडीओ पसरवला जात असल्यामुळे या ऍपवर बंदी घातली होती. त्यानुसार ऍन्ड्रॉईड आणि ऍपल स्टोअरवरून हे ऍपही हटवण्यात आले होते.

हे ऍप हिंदुस्थानमध्ये बंद केल्यामुळे कंपनीला दिवसाला पाच लाख कोटी डॉलर म्हणजेच साडे तीन कोटी रुपये नुकसान होत आहे. तसेच या ऍपशी निगडीत 250 लोकांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळू शकते अशी शक्यताही कंपनीने वर्तवली आहे.

हिंदुस्थानमध्ये 30 कोटी लोकांनी हे ऍप डाऊनलोड केले आहे. तर जगभरात 100 कोटींहून अधिक लोकांनी हे ऍप डाऊनलोड केले आहे. बाईट डान्स या कंपनीने या ऍपची निर्मिती केली आहे. या कंपनीचे मूल्य सध्या 75 अब्ज डॉलर इतके आहे. जर या ऍपवर बंदी कायम राहिली तर कंपनीचे कोट्यवधींचे नुकसान होणे अटळ आहे.

आपली प्रतिक्रिया द्या