टिकटॉक व्हिडिओतून पंतप्रधान मोदींना आव्हान, अहमदाबादेत तरुणीला अटक

tiktok-f

हिंदुस्थानात टिकटॉक विरोधी मोहीम उभारली गेली असतानाच टिकटॉक फेम सोनू नायकच्या हातात पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तिने लॉकडाऊन असतानाही इसानपूर ब्रिजवर व्हिडिओ शूट करून तो टिकटॉक वर अपलोड केला होता. त्यात तिने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘ब्रिजवर झोपून दाखवा’ असे आव्हान दिले होते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर सोनूला अटक करण्यात आली.

पोलीस कोठडीसमोर TikTok व्हिडीओ काढल्याने हवालदार निलंबित झाली, आता बनलीय आघाडीची अभिनेत्री

21 वर्षीय सोनू नायक ही खासगी रुग्णालयात परिचारिका असून टिकटॉक वर सतत व्हिडिओ अपलोड करते. सोमवारी रात्री घराबाहेर पडत तिने लॉकडाऊनच्या निषेधार्थ व्हिडिओ बनवला. तिने हा व्हिडिओ बनवताना लॉकडाऊनच्या नियमांचे सरळ सरळ उल्लंघन केले, तसेच थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लॉकडाऊन उठवल्यानंतर इसानपूर ब्रिजवर झोपून दाखवा असे आव्हान दिले.

आपली प्रतिक्रिया द्या