टिकटॉक स्टारला OLXवर विकायला काढलं, किंमत फक्त 200 रुपये!

1014

गेल्या काही दिवसांपासून कॅरीमिनाटी हे नाव चांगलंच गाजत आहे. याचं कारण आहे रोस्टर व्हिडीओ. कॅरीमिनाटीच्या रोस्टचा रोख असलेल्या एका टिकटॉक स्टारला मात्र भलतीच प्रसिद्धी मिळाली आहे. कारण, या व्हिडीओनंतर कुणीतरी त्याला ओएलएक्सवर विकायला काढल्याचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

या टिकटॉक स्टारचं नाव आमिर सिद्दिकी असं आहे. काही दिवसांपूर्वी कॅरीमिनाटी या यूट्युबरने आपल्या व्हिडीओमधून त्याची हुर्यो उडवली होती. ती खिल्ली सहन न होऊन आमिरने टिकटॉकवर कॅरीमिनाटीला धमक्या देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल केली होती. त्याच्या कल्पनेप्रमाणे त्याने हे कॅरीमिनाटीला दिलेलं प्रत्युत्तर होतं. मात्र, झालं भलतंच.

नेटकऱ्यांनी त्याला या ऑडिओ क्लिपवरून धुवायला सुरुवात तर केलीच, पण त्याचं टिकटॉक अकाउंटही बंद झालं. धमक्या देणारी ऑडिओ क्लिप असल्याने टिकटॉककडून त्याचं अकाउंट बंद करण्यात आलं. त्याच्याविरुद्ध तक्रारही दाखल झाली. अर्थात काही दिवसांनी त्याने त्याचं अकाउंट परत सुरू करण्यात यश मिळवलं. पण, त्यानंतर त्याला ओएलएक्स या वेबसाईटवर विकायला काढल्याचे फोटो व्हायरल होऊ लागले.

या व्हायरल फोटोंखाली त्याची किंमत फक्त 200 रुपये इतकी सांगण्यात आली. त्यानंतर आमिरच्या चाहत्यांनी ओएलएक्सला या फोटोंविषयी माहिती दिली. नंतर ते फोटो असलेलं अकाउंट डीलिट करण्यात आलं. मात्र, संधीची वाट बघणारे नेटकरी याही फोटोंवर तुटून पडले आणि त्यांनी हे फोटो व्हायरल करायला सुरुवात केली.

आपली प्रतिक्रिया द्या