अमेरिकेची टिकटॉक, वुईचॅटकर बंदी; 45 दिवसांच्या आत गाशा गुंडाळण्याचा ट्रम्प यांचा सक्त आदेश

583

कुरापतखोर चीनला शुक्रवारी अमेरिकेने जोरदार झटका दिला. टिकटॉक, वुईचॅट या मोबाईल ऍप्सनी 45 दिवसांच्या आत अमेरिकेतील गाशा गुंडाळावा तसेच दोन्ही ऍप्सच्या मालकांशी कुणीही कसलाही व्यवहार करायचा नाही, असे फर्मान काढत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी रात्री यासंदर्भातील दोन करारावर सह्या केल्या.

टिकटॉकमधून डेटा गोळा केला जात असून त्याचा देशाच्या सुरक्षेला आणि अर्थव्यवस्थेला धोका आहे, असे स्पष्ट करीत ट्रम्प यांनी चीनविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. याआधी हिंदुस्थानने सर्वप्रथम टिकटॉक आणि वुईचॅटला देशातून हद्दपार केले आहे. चीनच्या जवळपास 106 ऍप्सवर हिंदुस्थानने बंदी घातली आहे. गलवान खोऱ्यात चीन आणि हिंदुस्थानच्या सैन्यात झालेल्या रक्तरंजीत संघर्षानंतर देशभरात चीन विरोधात संतापाची लाट उसळली होती. त्याचा केंद्रसरकारवरही मोठा दबाव होता.

आपली प्रतिक्रिया द्या