धोनीबाबत कठोर निर्णय घ्या; या विधानानंतर क्रिकेटपटू मनोज तिवारी ट्रोल

1122

कॅप्टल कूल अशी ओळख असणाऱ्या महेंद्रसिंग धोनीबाबत क्रिकेटपटू मनोज तिवारीने केलेल्या विधानानंतर धोनीचे चाहते आणि क्रिकेट रसिकांनी ट्रोल केल्यानंतर मनोज तिवारीने त्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. मनोज तिवारीने निवड समितीला माजी कर्णधार एम.एस धोनीबाबत कठोर निर्णय घ्यावा असे आवाहन केले होते. या वक्तव्यावर धोनीच्या चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. यानंतर स्वत: मनोज तिवारी स्पष्टीकरण करणारे ट्विट केले आहे.

धोनीच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करणाऱ्या या बंगालच्या खेळाडूने लिहिले आहे की, सोशल मिडीयावर तुम्ही जे वाचता त्यावर विश्वास ठेवू नका, तिथे फक्त एक चित्र आणि विधान आहे. त्याचा अयोग्य अर्थ काढत आपल्यावर टीका होत असल्याचे त्याने म्हटले आहे. जो शांत असतो तो कधीही चुकीचे विधान करत नाही, असेही त्याने स्पष्ट केले आहे.

वृत्तानुसार मनोज तिवारी यांनी आपल्या विधानामध्ये असे म्हटले होते की, टीम इंडियासाठी धोनीने बरेच काम केले आहे. त्याने संघातही चांगले योगदान दिले आहे, पण आता निवड समितीने धोनीबाबत कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. हिंदुस्थानी क्रिकेट संघाला अजूनही धोनीची गरज असल्याचे मत विराट कोहलीने व्यक्त केले आहे. मात्र, नव्या क्रिकेटपटूंना संधी देण्यासाठी निवड समितीने कठोर निर्णय घ्यावे, असेही त्याने म्हटले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या