#MeToo टिव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्रीचा सहकलाकारावर विनयभंगाचा आरोप

84

सामना ऑनलाईन । मुंबई

‘उतरण’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री टिना दत्ता हिच्यासोबत तिच्या सहकलाकाराने ‘डायन’ या मालिकेच्या सेटवर तिचा सहकलाकार मोहीत मल्होत्रा याने गैरवर्तणूक केले आहे. मोहीतने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप टीनाने केला केला आहे. टीनाने याबाबत बालाजी प्रोडक्शनकडे तक्रार देखील केली आहे. मोहीत हा देखील हिंदी मालिकांमधील एक प्रसिद्ध अभिनेता आहे.

tina-dutta-mohit

पिकविला या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, मोहीत व टीना सध्या अॅण्ड टीव्हीवरील डायन या मालिकेत मुख्य भूमिकेत काम करत आहेत. या मालिकेसाठी एक रोमॅण्टिक सिन शूट करत असताना मोहीतने संधीचा फायदा घेत टीनाला स्पर्श केला. त्यानंतर टीना बराच वेळ सेटवर रडत बसली होती तर मोहीत हा काहीही न झाल्यासारखे वागत होता. याबाबत टीनाने प्रोडक्शन हाऊसकडे तक्रार केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या