घरगुती टीप्स

कांदा फ्राय करताना त्यात थोडी साखर घालून पहा. कांदा लगेच ब्राऊन रंगाचा होतो.

दही घट्ट करायचे असेल तर कोमट दुधात एक हिरवी मिरची घालून ठेवायची. मग पहा दही कसे घट्ट होते ते.

कांदा कापण्यापूर्वी काही वेळ फ्रिजमध्ये ठेवायचा. करून बघा… यामुळे डोळ्यात पाणी येणार नाही.

चीज किसल्यानंतर हाताला चिकटते. त्यासाठी किसण्यापूर्वी त्यावर थोडे तेल लावायचे. म्हणजे ते हाताला चिकटणार नाही.

भात शिजवल्यानंतर त्यात पाणी राहाते. त्या पाण्यात लिंबाचा थोडा रस मिसळून अर्धा तास केसांना लावून ठेवायचा. मग केस धुऊन टाकायचे. केस चमकदार आणि मुलायम होतील.

आपली प्रतिक्रिया द्या