Tips : त्वचा आणि केसांसाठी एलोवरा जेल अत्यंत गुणकारी

1774
aloe vera

एलोवेरा त्वचा, केस आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. तुमच्या केसांसाठी आणि त्वचेसाठी एलोवेरा कसा फायदेशीर ठरतो ते पुढे दिले आहे. मात्र हे उपाय करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

डाग – पिंपल दूर करण्यासाठी

चेहऱ्यावरील डाग, पुटकुळ्या (पिंपल) यांच्यापासून तुमची सुटका करायची असेल तर रोज एलोवेरा जेल दररोज 20 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि मग पाण्याने चेहरा धुवून टाका.

त्वचेला टवटवीत बनवतो

एलोवेरामध्ये बीटा कॅरोटी आणि व्हिटामिन ए सारखे एन्टीऑक्सिडेंट्स असतात, जे नैसर्गिक ताजेपणा जपतात. त्वचा टवटवीत ठेवण्यासाठी रोज एलोवेरा लावले पाहिजे.

मेकअप रिमूव्हर

मेकअप पुसण्यासाठी एलोवेरा जेलचा उपयोग केल्यास चांगला फायदा मिळतो. मेकअप केलेल्या चेहऱ्यावर एलोवेरा जेलचे लेपन करा आणि मग कापसाने पुसून काढा.

सनबर्नपासून मिळेल आराम

एलोवेरा जेलमध्ये अँटीऑक्सिडन्ट असते जे उष्णतेपासून त्वचेचे रक्षण करते. एलोवेरा जेलला फ्रिजमध्ये थंड करून सनबर्न स्कीनवर लावा, त्यामुळे थंडावा मिळेल.

एलोवेरा कंडीशनर

एलोवेरमध्ये प्रोटियोलिटिक एन्जाइम असते, जे केसांना नैसर्गिकरित्या कंडीशनिंग करतात. शॅम्पू केल्यानंतर एलोवेरा जेलला कंडीशनर म्हणून वापरू शकतात.

केसांच्या वाढीसाठी उपयोगी

एलोवेरामध्ये व्हिटामिन ए, सी, आणि ई मिळते. ज्यामुळे केसांची वाढ होते आणि केस चमकदार बनतात. रोज एलोवेरा जेल वापरल्यास केसांची वाढ चांगली होते.

डोक्याची खाज घालवते

एलोवेरा जेल अँटी इन्फेमेटरी असते ज्यामुळे डोक्याची खाज कमी होते. अंघोळीच्या आधी 20 मिनिटे जेलने मसाज करा आणि मग शॅम्पू करा. डँड्रफ देखील दूर करते.

टक्कल कमी करते

टक्कल कमी करण्यासाठी एलोवेरा जेलचा वापर करा. नवे केस उगवण्याचे गुण एलोवेरामध्ये असतात.

वरील उपाय करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या