हे वाचा आणि तुमच्या दागिन्यांची किंमत तुम्ही ठरवा

सामना ऑनलाईन । मुंबई

सोन्याचे दागिने खरेदी करताना अनेकदा आपण उत्साहाच्या भरात अनेक चुका करतो आणि आपली नकळत फसवणूक होते. दागिने २४ कॅरेट सोन्याचे असल्याचा दावा सोनार करत असेल तर तो खोटं बोलतोय हे नक्की, कारण २४ कॅरेट हे सोन्यांचं शुद्ध रुप आहे आणि ते एवढं मऊ असतं की त्यापासून दागिने बनवणे शक्यच नाही. सोन्याचे दागिने बनवण्यासाठी बऱ्याचदा २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो ज्यामध्ये ९१.६ टक्के सोनं असतं. दागिने मजबूत, टिकाऊ बनण्यासाठी त्यामध्ये चांदी, तांबे, जिंक किंवा कॅडमियम मिसळलं जातं.

सोन्याचे दागिने खरेदी करताना प्रथम तुम्हाला किती कॅरेटचं सोनं खरेदी करायचं आहे हे आधी ठरवून घ्या. कारण कॅरेटसोबत सोन्याच्या दागिन्यांची गुणवत्ता आणि किंमत यांच्यात फरक असतो. म्हणजे जितकं जास्त कॅरेट तितकं सोनं महाग. सोनं खरेदी करताना त्याची गुणवत्ता पाहणे गरजेचं असतं. ग्राहकांनी हॉलमार्क असलेल्या सोनं खरेदी करण्यावर जास्त भर द्यावा. हॉलमार्कचा फायदा असा होतो की, जेव्हा तुम्ही दागिने विकायला काढता त्यावेळी तुम्हाला दागिन्यांची घसारा किंमत कापली जाणार नाही आणि तुम्हाला तुमच्या दागिन्यांची खरी किंमत मिळेल.

कॅरेटनुसार हॉलमार्क नंबर

२३ कॅरेट का नंबर ९५८
२२ कॅरेट का नंबर ९१६
२१ कॅरेट का नंबर ८७५
१८ कॅरेट का नंबर ७५०
१४ कॅरेट का नंबर ५८५
९ कॅरेट का नंबर ३७५

सोन्याची किंमत कशी ठरवावी
कॅरेट सोन्याचा अर्थ असा आहे की १/२४ सोनं. म्हणजे २४ कॅरेट सोन्याची किंमत २७ हजार असल्यास २२ कॅरेट सोन्याची किंमत २७००० x २२/२४ म्हणजे २४,७४५० रुपये. यानुसार तुम्ही प्रत्येक कॅरेट नुसार सोन्याची किंमत काढू शकता.

सोन्याची दागिन्यांची किंमत

समजा, २२ कॅरेट सोन्याची किंमत २७,३५० रुपये आहे. तुम्हाला ९.६ ग्रॅमचे सोन्याची दागिने खरेदी करायचे आहेत तर एक ग्रॅम सोन्याची किंमत २७३५ रुपये असणार. त्यानुसार २७३५ x ९.६ ची किंमत २६ हजार २५६ रुपये होणार. यामध्ये सोनाराचा मेकिंग चार्ज १० टक्के असल्यास तो चार्ज होणार २६५०. त्यानुसार ९.६ ग्रॅमच्या दागिन्याची किंमत होणार २६, २५६ + २६२५ = २८, ८८१. त्यानंतर ३ टक्के जीएसटी चार्ज लागल्यानंतर ९.६ ग्रॅम दागिन्याची किंमत २९,७४८ रुपये होईल. अशा तऱ्हेने तुम्ही तुमच्या दागिन्याची किंमत स्वत: काढू शकता.