मुलांसाठी पौष्टिक…

44

मुलांना पौष्टिक काय द्यावं हा नेहमी पडणारा प्रश्न…

> पालकच्या भाजीत मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमीन्स भरपूर असतात. ही भाजी आहारात असेल तर मेंदूची ताकद वाढते.

> स्मरणशक्ती तीक्ष्ण करायची असेल तर दालचिनीशिवाय पर्याय नाही. कारण त्यात सिनेमेल्डिहाइड, प्रथिने आणि फायबर मोठय़ा प्रमाणावर असते.

> सफरचंदामध्ये क्वर्सेटीन नावाचे द्रव्य असते. हे द्रव्य आपल्या शरीरात गेल्यास मेंदूची ताकद वाढायला मदत होते. त्यामुळे मिळेल तेव्हा दिवसभरातून एखादे सफरचंद खायलाच पाहिजे.

> मेंदू सक्रीय होऊन जलद काम करावा असं वाटत असेल तर डार्क चॉकलेट खा. कारण त्यातील फ्लेवोनॉइड्स, कॅल्शियम आणि व्हिटॅमीन बी-६ यामुळे मेंदू जलदगतीने काम करतो.

> बदामामध्ये व्हिटॅमीन-ई, लोह आणि कर्बोदके असतात. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. दिवसभरातून चार ते पाच बदाम खाणे चांगले.

> ताणतणाव कमी व्हावा असं वाटत असेल तर हळद फार उपयुक्त ठरेल. त्यात करक्युमीन, पोटॅशियम आणि सेलेनियम भरपूर असते.

> केळ्यात मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि लोह मोठय़ा प्रमाणात असतात. त्यामुळे दररोज एक वा दोन केळी खाल तर अभ्यासात लक्ष लागेल.

> ओट्समुळेही मेंदूची क्षमता वाढते. त्यातील कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमीन बी6 आणि लोह यामुळे शरीराला हवी असणारी शक्ती मिळते.

> लसणामध्ये एलिसीन, सेलेनियम आणि व्हिटॅमीन-सी भरपूर असते. त्यामुळे लसणाचा वापर आहारात असेल तर अभ्यासात लक्ष केंद्रीत होऊन बराचवेळ थकवा जाणवणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या