कांदा चिरताना

266

सामना ऑनलाईन । मुंबई 

रडायला आल्यावरच अश्रू पहायला मिळतात. पण कांदा हा असा पदार्थ आहे जो सगळ्यांच्याच डोळ्यात अश्रू आणतो. मग त्यात चिरणाऱयापासून आजूबादूला बसलेल्या माणसांनाही कांदा रडवतो. कांद्यात वासयुक्त, डोळ्यांना दाहक, चुरचुरणारे आणि अश्रू आणणारे असे रसायन असते. या रसायनात एका रेणूत ६ कार्बन, १२ हायड्रोजन आणि २ गंधकाचे अणू असतात. अमिनो ऑसिड, सल्फोक्सिड ऑसिड आणि अनजाईम ऑसिड याच्यापासून सल्फोनिक ऑसिड तयार होते. यामुळे हे ऑसिड हवेत पसरते. आणि डोळ्यांतील अश्रूंमध्ये संयोग पावतात आणि डोळ्यातून पाणी येते.

– सर्वप्रथम कांद्याची साल काढा, त्याचा टोकाचा भाग आणि खालचा नको असलेला भाग काढून टाका. तो मधोमध कापून त्याचे दोन भाग करा आणि अर्धा तास तो पाण्यात बुडवून ठेवा. मग, आता कांदा चिरताना तुमच्या डोळ्यांची जवजळ होणार नाही.

– कांद्याची वरील नको असलेली साल काढून तो फ्रिजमध्ये ठेवा. नंतर तो काही वेळाने काढून कापा. डोळे जळजळणार नाहीत. पण कांदा फ्रिजमध्ये ठेवल्याने फ्रिजला वास येण्याची अधिक शक्यता असते.

– कांदा योग्य पद्धतीने चिरल्यास तो सोपा वाटतो. त्यासाठी कांद्याचा सर्वप्रथम वरील भाग कट केल्यास तो चिरण्यास सोपा जातो.

– शक्य असल्यास वाहत्या पाण्याखाली कांदा कापला तर त्याचा चुरचुरीतपणा कमी होतो.

– कांदा कापल्यानंतर तो काही वेळाने जेवणात वापरायचा असेल तर छोटय़ा बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात तो ठेवा. म्हणजे चव बिघडणार नाही आणि वास टिकून राहील.

– कांदा कापण्याच्या ठिकाणी मेणबत्ती, लॅम्प लावा.

– कांदा कापताना केव्हाही पंखा बंद ठेवा, डोळ्याला कांदा झोंबणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या