अशी करा स्मार्ट दिवाळी..

सामना ऑनलाईन। मुंबई

दिवाळीची खरेदी म्हणजे महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय… कारण हा असा एकच सण आहे. जो त्याच्याबरोबर दिव्यांची आरास तर आणतोच, आणि हक्काची खरेदी. दिवाळीत स्पेशल दिसण्याचा सगळयाच जणींचा प्रयत्न असतो. मग यासाठी ड्रेसेस, साड्या यांच्याबरोबर चपला, दागिने यांचीही खरेदी केली जाते. पण नंतर लक्षात येत की, घेतलेल्या साडीवर चप्पल शोभत नाही, अनारकलीवर कानातले मॅच होत नाहीत. पण अशावेळी गोंधळून न जाता जर तुम्ही खाली दिलेल्या काही टिप्सचा वापर केलात, तर तुमची दिवाळी नक्कीच चांगली साजरी होईल.

काही उपयुक्त टिप्स

जर तुम्ही या फेस्टिव सिझन ड्रेस वापरणार असाल, तर अनारकली, लाचा, लेहंगा असे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. यांसारख्या ड्रेसेसमध्ये आता ‘इन बिल्ट ओढणी’चा नवीन प्रकार सध्या बराच चर्चत आहे. या ओढण्या ड्रेसला दोन्ही बाजूला लावलेल्या असल्यामुळे त्या तुम्हाला सांभाळत बसण्याची गरज भासत नाही. यासोबत काही भरलेले असे पारंपारिक दागिने घातल्यास चांगला लुक मिळू शकतो.

anarkaliसाडी हा प्रत्येक महिलेचा वीक पॉइट मानला जातो. हल्ली साड्यांमध्ये विविध प्रकार बघायला मिळत असले, तरी फेस्टिव सिझनला पारंपारिक साड्या चांगला लुक देतात. पण त्याव्यक्तीरिक्त सिल्क, शिफॉन, जार्जेट यांसारख्या साड्या फेस्टिव सिझनमध्ये चांगल्या दिसतात. यात निळा, गुलाबी, पोपटी रंग चांगले दिसतात.

saree

तुम्हाला ड्रेस वापरण्याचा कंटाळा आला असेल तर एखाद्या प्रिंटेड क्रॉप टॉपवर प्लेन स्कर्टदेखील तुम्ही वापरु शकता. त्यासोबत लटकन लावून तुम्ही ऑक्साइडचे दागिने घातल्यास अधिकच उत्तम दिसतो.

skirtदागिने म्हणजे महिलांचा जिव्हाळ्याचा विषय.. दिवाळी निमित्त बाजारात काही पारंपारिक दागिने नव्या रुपात बाजारात उपलब्ध झाले आहेत. त्यात कडा, मोत्याच्या माळी, तीन-चार पदरी हार, झुमके याची सध्या बाजारात रैलचैल सुरु आहे.

tradtional-jewalleryपारंपारिक दागिन्यांसोबत मोजडी, हिल्स यांसारख्या पारंपारिक चपला तुम्ही या सिझन मध्ये वापरु शकता. ड्रेस, साडी यासारख्या आऊटफिटवर या चांगल्या लुक देतात.

footware