पाणी कधी प्याल?

25
नियमित आणि पुरेसे पाणी पिणे आरोग्यासाठी आवश्यक आहे.
  • जेवणापूर्वी अर्धा तास एक ग्लास पाणी प्यायल्याने अन्नपचन चांगले होते. जेवणानंतर पाणी पिण्याची सवय सोडायला हवी. कारण त्यामुळे शारीरिक आरोग्य बिघडू शकते.
  • आंघोळीपूर्वी पाणी पिण्याची सवय चांगली. कारण त्यामुळे बऱ्याच रोगांपासून बचाव होतो. त्यामुळे रक्ताभिसरणही चांगले होते.
  • झोपण्यापूर्वी पाणी पिण्याची सवय खूपच चांगली आहे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्या. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
  • रोज सकाळी रिकाम्यापोटी दोन मोठे चमचे मध, अर्धा चमचा लिंबाच्या रसासोबत गरम पाणी प्या. त्यामुळे रक्तशुद्धी होते. कॉलेस्टेरॉलही नियंत्रणात राहते.
  • पाणी पिताना एकेक घोट सावकाश पाणी प्यावे. यामुळे पाण्यावाटे तोंडातली लाळही पोटात जाते.पोटातील आम्ल आणि तोंडातील लाळ यांचेही पाणी होते.
  • पाणी जेवढे हळूहळू प्याल तेवढे त्याचे क्षार तयार होऊन अन्नपचन होईल. यामुळे पोटही पाण्याप्रमाणेच म्हणजेच स्वस्थ राहील. नेहमी बसून पाणी प्यावे.
  • काकडी, टरबूज, खरबूज, शिंगाडा यावर कधीही पाणी पिऊ नये, कारण यामध्ये पाण्याचे प्रमाण मुळातच जास्त असते. अशा फळांवर पाणी प्यायल्यामुळे कॉलरा होण्याचा धोका संभवू शकतो.शिवाय चहा, कॉफी, दूध अशा गरम पेयांवरही पाणी पिऊ नये.
  • नेहमी शारीरिक तापमानानुसार पाणी प्यावे. जास्त गरम किंवा जास्त थंड पाणी प्यायल्याने पोटाला अतिरिक्त कार्य करावे लागते. शिवाय बुद्धी, हृदय आणि क्रियाशीलतेवरही परिणाम होतो.
  • व्यायामानंतर पाणी पिणे खूपच गरजेचे आहे. व्यायामावेळी येणाऱ्या घामामुळे शरीरात निर्माण होण्याची पाण्याची कमतरता पाणी पिण्याने भरून निघते.
आपली प्रतिक्रिया द्या