चेहरा खुलवा

561

> चेहऱ्यावरील डाग आणि सन टॅन नष्ट करण्यासाठी बटाटा-लिंबू मास्क उपयुक्त आहे. याकरिता एक बटाटा आणि अर्धे लिंब घ्या. बटाटय़ाची पेस्ट तयार करा. त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घाला. हे मिश्रण २० मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवा.

> काकडी आणि कोरफडीच्या गरापासून तयार केलेला मास्क डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळे नष्ट करतात. तसेच यामुळे चेहऱ्यावरील छिद्रेही मोकळी होतात. काकडीची पेस्ट करून त्यामध्ये २ चमचे कोरफडीचा गर घाला. या मास्कचा जाडसर थर चेहऱ्याला लावा. १५ मिनिटांनी चेहरा धुवा.

> तजेलदार आणि चिरतरुण त्वचेकरिता एक पिकलेलं केळ कुस्करून घ्या. त्यामध्ये एक चमचा दही घाला. याचे जाडसर मिश्रण चेहऱ्याला लावा. १५ मिनिटे थंड पाण्याने धुवा.

> हळदीमध्ये अँण्टीबॅक्टेरियल गुणधर्म आहे. त्यामुळे त्वचेवरील  काळपटपणा, डाग आणि ऍ नष्ट होण्यासाठी हळद आणि मधाचा मास्क उपयुक्त आहे. हळदीत मध मिसळून १५ मिनिटे चेहऱ्याला लावा. त्यानंतर गार पाण्याने चेहरा धुवा.

आपली प्रतिक्रिया द्या