ओठांची काळजी कशी घ्याल?

627

> कोरफडीचा गर लावल्याने ओठ मुलायम राहतात.

> ग्लिसरीन, केसर आणि गुलाबपाणी एकत्र करून लावा.

> गुलाबी ओठांसाठी ताज्या लाल गुलाबाच्या पाकळ्या वाटून मध आणि लोण्यात मिसळून लावा.

> झोपण्यापूर्वी गुलाबपाण्यात ग्लिसरीन आणि केसर मिसळू लावा. ओठांचा काळपटपणा दूर होईल.

> डाळींबाचे दाणे दुधाच्या सायीत वाटून ओठांना लावा. काही दिवस हा उपाय करा. ओठ सुंदर दिसतील.

> सोललेले संत्रे ओठांवर चोळा. ओठ मुलायम होतील.

> नारळपाणी, काकडीचा रस आणि लिंबाचा रस एकत्र करून लावल्याने ओठांचा काळेपणा दूर होतो.

> बिटामध्ये लाल रंग निसर्गतःच असतो. त्यामुळे ते लाल चुटुक व्हायलाही मदत होते.

> लिंबाचा रस रोज रात्री झोपण्यापूर्वी ओठांना लावा. हा उपाय दररोज केल्यास दोन महिन्यात ओठांचा रंग उजळेल.

> हळद पावडर आणि साय एकत्र करून ओठांना लावा. काळेपणा नष्ट होईल.

> थोडय़ाशा बदाम तेलात मध मिसळून ओठांना लावून ठेवा. यामुळे ओठ गुलाबी होतील.

आपली प्रतिक्रिया द्या