सुरक्षित राहा!

161
local-mumbai

अलीकडे रेल्वेतून प्रवास करताना अनेक हल्ले आणि अपघाताच्या घटना समोर येत आहेत. अशावेळी महिला प्रवाशांनी काय काळजी घ्यावी?

रेल्वे स्थानकावर असताना

> रेल्वे स्थानकावर असताना कोणती ट्रेन आहे, त्याची माहिती इंडिकेटरवर बघून घ्या. त्यानंतर कोणती ट्रेन आहे हेही माहीत करून घ्या.

> ट्रेन येत असताना फलाटावर आखलेल्या पिवळ्या रेषेच्या बाहेर उभे राहा.

> चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नका.

> ट्रेन पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मवरुन धावत जाऊ नका, तोल जाण्याची शक्यता असते.

> एक्सलेटर किंवा पायऱ्या चढताना ओढणी, स्टोल, साडीचा पदर, बॅगेचा पट्टा खाली सगळे नीट सावरून घ्या.

ट्रेन पकडताना

> ट्रेन पूर्णपणे थांबल्यानंतरच त्यामध्ये चढा. भरपूर गर्दी असलेल्या ट्रेनमध्ये चढण्याची जोखीम पत्करू नका, चढण्यापूर्वी आधीच्या प्रवाशांना थोडे पुढे सरकण्याची विनंती करावी.

> ट्रेनमध्ये चढताना-उतरताना फलाटावरच्या अंतराकडे लक्ष द्या, हातात भरपूर सामान असेल तर मालडब्यात चढा.

> ट्रेनमध्ये चढताना लांब केस असल्यास शक्यतो ते व्यवस्थित बांधून घ्या, मोठे केस मोकळे ठेवून ट्रेनमध्ये चढू नका. गर्दीत केस खेचले जाण्याची शक्यता असते.

> प्रवास करताना लहान मुले सोबत असतील तर त्यांचा हात पकडून त्यांना ट्रेनमध्ये चढवा.

ट्रेनमध्ये चढल्यानंतर

> ट्रेनमध्ये चढल्यानंतर जागा असल्यास बसून घ्यावे, नसल्यास एका बाजूला   पकडून उभे राहावे.

> शक्यतो उतरणाऱ्या प्रवाशांच्या मध्ये येणार नाही अशा ठिकाणी उभे राहावे.

> हातात सामानाचा इतर प्रवाशांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.

> ज्येष्ठांना, गरोदर महिलांना बसण्यासाठी जागा द्यावी.

> ट्रेनमध्ये चढल्यावर शक्यतो दरवाज्याजवळ उभे राहू नका.

> दरवाजावर उभे असल्यास मौल्यवान वस्तू हाताळू नका.

> ट्रेनमधून काही वस्तू खाली पडल्यास हायपर न होता तिथे असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत कोणालातरी घेऊन मगच खाली उतरा.

> ट्रेनमध्ये काही चुकीचे वाटल्यास हेल्पलाईन नंबर्सवर संपर्क साधा, त्यासाठी ते नंबर आपल्या मोबाईलमध्ये जतन करुन ठेवा.

> प्रवासात इअरफोनचा वापर टाळा

> दरवाजात उभे राहून फोन हाताळू नका.

या गोष्टी लक्षात ठेवा

> ट्रेनमध्ये येणाऱ्या विक्रेत्यांकडून सामान खरेदी करणे टाळा, तसे केल्यास विक्रेते कमी होतील आणि सुरक्षेचा प्रश्न उद्भवणार नाही.

> सर्वात महत्त्वाचे प्रवास करताना सतर्क राहा, आपल्या आजुबाजूला काय चाललेय तिथे लक्ष ठेवा.

>  प्रवासात काही गंभीर प्रसंग जाणवल्यास चैन खेचून ट्रेन थांबवू शकता.

आपली प्रतिक्रिया द्या