हिवाळ्यात वजन नियंत्रित करण्याच्या टिप्स

84

हिवाळयाच्या दिवसांत वाढलेली भूक आणि तळलेले गरमागरम पदार्थ खाण्याची हौस यांचा मेळ साधला जातो आणि दिवसभरात बरेच अरबटचरवट पदार्थ खाल्ले जातात. या अशा खाण्याने वजन वाढते. पण थोडी काळजी घेतली तर थंडीचा आनंद लुटताना वजन नियंत्रित ठेवणे सहज शक्य आहे. यासाठी सहज अमलात आणता येण्याजोग्या टिप्स

१. ज्या प्रमाणात खाल्ले आहे त्याच प्रमाणात पाणी प्या.

२. हिवाळ्याच्या दिवसात हिरव्या भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. यामुळे रोजच्या आहारात गाजर, काकडी, टोमॅटो, मुळा, बीट या भाज्यांचा समावेश करा. हिरव्या भाज्यांचे सॅलड खाल्ले तरी हरकत नाही. पालक, मेथी, शेपू या पालेभाज्याही खाव्यात. यामुळे वजन वाढणार नाही पण रक्तशुद्धी होईल.

३. रोज थोडावेळ कोवळी सूर्यकिरणे अंगावर घ्या. यामुळे चयापचय प्रक्रिया सुधारते आणि अन्नाचे पचन लवकर होते. शरीरात चरबी साठण्याचे प्रमाण कमी होते.

४. थंडीच्या दिवसात लवकर झोपून लवकर उठा.

५. चहा-कॉफीचे सेवन टाळणे आरोग्यासाठी लाभदायी आहे. पण ते कठीण असल्यास निदान चहा-कॉफी पिण्याचे प्रमाण कमी करा. झोपण्याआधी चहा-कॉफी पिणे टाळा.

६. डाळी तसेच भाज्यांचे घरी तयार केलेले सूप दररोज प्रत्येक जेवणाआधी प्या.

आपली प्रतिक्रिया द्या