Tips : उन्हाळ्यातही रहाल तंदूरुस्त; फक्त आहारात करा या भाज्या-फळांचा समावेश

थंडीचा हंगाम आता संपला असून अचानक पारा वाढू लागला आहे. उकाडा आणि उन्हाच्या झळांचा परिणाम आता देशाच्या अनेक भागात दिसू लागला आहे. अशा वेळी आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये आवश्यक ते बदल करणे आवश्यक आहे. कारण त्याच्या खूप मोठा परिणाम शरीरावर होतो. उष्णतेमुळे अनेकांना डिहायड्रेशनचा त्रास होतो. तर उन्हाळ्यात जेवणही कमी जाते. व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची पातळी खाली जाते. बदलत्या ऋतूमानात आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीतून शरीराची काळजी कशी घेतली जाते ते पाहूया.

टोमॅटो –

tomato1

टोमॅटोमध्ये एंटीऑक्सिडेंट आणि व्हिटामिन C ने भरपूर असते. तसेच लायकोपीनसारखे अत्यंत फायदेशीर फायटोकेमिकल्स असतात, जे कँसर सारख्या क्रोनिक आजारातून बरे होण्यासाठी मदत करतात.

दोडकं –

dodaka

उन्हाळ्यात दोडक्याची भाजी जरूर खावी. दोडक्यात पॅक्टिन नावाचं फाइबर असतं जे हृदयासाठी अत्यंत फायदेशीर असतं. हे कोलेस्ट्रॉल देखील कमी करतं.

दही-

curd-new-image

दह्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात. उन्हाळ्यात शरीराचं तापमान संतूलित ठेवण्यासाठी आणि थंडावा वाटण्यासाठी दही अत्यंत उपयोगी आहे. दह्यामध्ये असलेल्या प्रोटीनने पोट भरत आणि जेवल्यानंतर बराच वेळ भूक लागत नाही. अशा प्रकारे सतत खाण्याच्या सवयीपासून देखील सुटका होते. दह्यात प्रोबायोटिक्स असते जे पचन संस्था चांगली राखण्यास मदत करते.

कलिंगड –

watermelon-2

कलिंगडात पाण्याचं प्रमाण अधिक असल्यानं शरीराला थंडावा मिळावा आणि डिहायड्रेशनला दूर राखण्यासाठी त्याचा उपयोग होतो. टरबूजामध्ये पाण्याचं प्रमाण अधिक असते आणि ते खाल्यावर लवकर भूक लागत नाही. टरबूजामध्ये देखील लायकोपीन असते जे त्वचेचं उन्हापासून रक्षण करतं.

संत्र –

orange-detox

संत्र्यात खूप पोटॅशियम असते, जे उन्हाळ्यात अत्यंत आवश्यक मानले जाते. उन्हाळ्याच्या दिवसता घामावाटे पोटॅशियम बाहेर पडतं ज्यामध्ये स्नायूंचे त्रास जानवण्याची शक्यता असते. तेव्हा अशा हवामानात संत्रं खाल्याने शरीरातील पोटॅशियमचं प्रमाण कायम राहतं. संत्र्यात 80 टक्के रस असतो जो तुम्हाला हायड्रेटेड ठेवतो.

सफरचंद, अंजीर आणि नासपती –

apple

या तिन्ही फळांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. अधिक पोषकतत्व हले असल्यास सालासकट खावं. साली सकट खाता येत असल्यानं ही फळं खाण्याआधी व्यवस्थित धवून घेणं आवश्यक आहे. दोन मध्यम आकाराच्या अंजीरात 1.5 ग्रॅम फायबर असतं.

ग्रीन टी –

green-tea

उन्हाळ्याच्या दिवसात ग्रीन टी तुम्हाला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतं. ग्रीन टी कँसरसोबत लढण्यास मदत करते. कोलेस्ट्रॉल कमी करते आणि मेटाबॉलिजम चांगलं करते. उन्हाळ्यात थंड पाण्यातही ग्रीन टी पिता येत. ग्रीन टी मध्ये पोषक तत्त्व असतात.

कच्चे सॅलड –

salad-6

या ऋतूमध्ये हिरव्या भाज्यांचं सॅलड जरूर खावं. नारंगी आणि हिरव्या रंगाच्या भाज्यांमध्ये कॅरोटीनॉयड असतं जे शरीरात व्हिटामिन A निर्मितीचं काम करतं. त्वचेला टवटवीत ठेवण्यासाठी हे मदत करतं. सॅलडमध्ये गाजर, टरबूज, टोमॅटो, द्राक्ष यांचा समावेश असावा.

सूकामेवा –

dry-fruits

उन्हाळ्यात मनुके जरूर खावे. बदाम, काजू आणि भूईमूगात मोनोअनसॅचुरेटेड आणि पॉलीअनसॅचुरेटेड फॅट्स असतात. कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यासयाची मदत होते.

आपली प्रतिक्रिया द्या