या वस्तू घरात ठेवा!

3

00गंगाजल

गंगेत अंघोळ करणं खूपच पवित्र आणि चांगलं मानलं जातं. भगवान शंकराने गंगा मातेला आपल्या जटांमध्ये स्थान दिलं होतं. त्यामुळे गंगेचं पाणी आपल्या घरात ठेवणं भरभराटीचं आणि प्रगतीचं लक्षण असतं. गंगाजल घरात असेल तर घरातल्या सगळ्याच सदस्यांना हमखास यश मिळून त्यांची प्रगती होते असं मानलं गेलंय.

पाण्याने भरलेले तांब्याचे भांडे

घरात काही ठिकाणी तेथील सदस्यांचा वावर जास्त असतो. नेमक्या त्याच ठिकाणी तांब्याच्या भांडय़ात पाणी भरून ठेवल्यामुळे घरात नेहमी प्रेम आणि विश्वास कायम राहातो असं म्हटलं जातं.

शंख

घरात शंख ठेवल्यामुळे घरातील कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष आपोआप निघून जातो असं जुनेजाणते लोक सांगतात. ज्या घरात पूजेच्या ठिकाणी म्हणजे देव्हाऱ्यात शंखाला मानाचे स्थान दिले जाते तेथे खुद्द लक्ष्मी वास करते अशी मान्यता आहे. लक्ष्मीदेवीची वेगळी मूर्ती ठेवली नाही तरी चालू शकेल.

रुद्राक्ष

भगवान शंकरांच्या अश्रूंपासून रूद्राक्षाची निर्मिती झाली असं मानलं जातं. त्यामुळे घरातल्या कर्त्या पुरुषाच्या खोलीत एक तरी रूद्राक्ष ठेवल्यामुळे सर्वच सदस्यांना त्याचा लाभ मिळतो.

नाचणारा गणपती

पैशाअडक्याची चिंता घरात सतत सतावत असेल तर शंखासोबतच गणपतीची नृत्य करणारी छोटीशी मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते. गणपतीची नजर थेट घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असावी.

बासरी

श्रीकृष्णाच्या हातात सतत असलेली बासरी आपल्या घरात असली पाहिजे. कारण त्यामुळे घरात लक्ष्मीचा वावर राहातो. ती घरातच राहाते. बासरीमुळे वास्तूदोषही दूर होतात आणि धन मिळवण्यात काहीच अडचणी येत नाहीत.