गोड पदार्थ खाताय? मग ‘हे’ नक्की वाचा!

सामना ऑनलाईन । मुंबई

मजामस्ती, आनंद, आणि फराळावर ताव मारण्याचा सण म्हणजे दिवाळी. दिवाळीच्या फराळात गोड पदार्थांचा जास्त प्रमाणात समावेश होतो. पण गोड फराळावर ताव मारण्याआधी या काही टिप्स लक्षात ठेवलात, तर तुमची दिवाळी नक्कीच आरोग्यदायी होऊ शकते.

काही उपयुक्त टिप्स

१. रिकाम्या पोटी कोणतेही गोडाचे पदार्थ खाऊ नये. विशेषत: घरातील काही लहान मुलांना सकाळी उठल्यानंतर गोड पदार्थ खाण्याची सवय असते. पण त्यामुळे त्यांना जंताचा त्रास होऊ शकतो.

२. जेवणानंतर गोड पदार्थ खाणे सहसा टाळा. जेवणानंतर गोड पदार्थांचे सेवन केल्यास अतिरिक्त कॅलरीजचे प्रमाण वाढते. याशिवाय लठ्ठपणाची समस्येतही वाढ होऊ शकते.

३. रात्री झोपण्यापूर्वी गोड पदार्थ खाऊ नका. यामुळे कॅलरी वाढण्यासोबत रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढते.

४. दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ, मिठाई जास्त वेळ फ्रिजमध्ये ठेवू नका. अशा पदार्थांचे सेवन केल्यास तुम्हाला इंफेक्शन होण्याचा धोका संभवतो.

५. जेवणादरम्यान मिठाई खाणे अधिक फायदेशीर आहे. त्यामुळे रक्तातील साखरचे प्रमाण योग्य राहते. तसेच तात्काळ एनर्जीही मिळते.