Tips : त्वचेला टवटवीत बनवेल 1 चमचा मध

मध हे अत्यंत गुणकारी तत्त्वांनी भरलेलं आहे. मधाच्या प्रत्येक थेंबामध्ये पौष्टीकता आहे. त्यामुळेच दैनंदिन जीवनात प्रमाणात मधाचा वापर केला जातो. मधाच्या सेवनाचे जसे फायदे आहेत, तसेच त्वचेवर किंवा केसांना लावण्याचे देखील खूप फायदे आहेत. अर्थात हे सर्व प्रयोग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करणे आवश्यक आहे.

मध गुणकारी का?

मधात जास्त प्रमाणात अँटी बॅक्टेरियल गुण आढळतात. ज्यामुळे हे औषधी म्हणून उपयोगात आणले जाते. नैसर्गिक मध वापरण्याचे अनेक फायदे आहेत.

त्वचेसाठी मध गुणकारी कसे?

मध - डोळ्याच्या खाली मध लावा आणि वीस मिनिटे तसेच ठेवा. यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा आणि कोरडे होऊ द्या. दररोज हा उपाय दोन वेळा करू शकता.
मध – डोळ्याच्या खाली मध लावा आणि वीस मिनिटे तसेच ठेवा. यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा आणि कोरडे होऊ द्या. दररोज हा उपाय दोन वेळा करू शकता.

1. त्वचेसाठी मध गुणकारी ठरल्याचे पाहायला मिळाले आहे. त्वचेवर मधाचे लेपन केल्यास त्वचा आरोग्यपूर्ण, टवटवीत, ताजीतवानी, तसेच चमकदार दिसते.

2. त्वचेवरील पुटकुळ्या खीळ कमी करण्यासाठी मधाचा वापर केला जातो. खीळ, पुटकुळ्या कमी करण्यासाठी लागणारे अँटी बॅक्टेरियल गुण मधात आढळतात.

3. अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये मध वापरले जाते, कारण ते मुळाशी जाऊन त्वचेला मॉइश्चराईज करते. यामुळे त्वचेचा कोरडेपणा नाहीसा होतो.

4. त्वचेवर डाग उठले असल्यास मधाचा वापर करून ते मिटवता येतात. एक चमचा मधात खोबऱ्याचे तेल किंवा ऑलिव्ह ऑइल एकत्र करायचे. मग ते मिश्रण चेहऱ्यावर लावून 2 मिनिटे मसाज करावा.

5. क्लिंजर म्हणून मधाचा वापर करण्यात येतो. एक चमचा मधात दोन चमचे खोबऱ्याचे तेल घेऊन एकत्र करा. ते मिश्रण चेहऱ्यावर लावून नंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या.

6. चेहरा टवटवीत दिसण्यासाठी एक चमचा मध टोमॅटोच्या रसात एकजीव करा. मग चेहऱ्यावर लावा. यामुळे सन टॅनिंग, त्वचेवरील डाग दूर होतील आणि त्वचा उजळून टवटवीत पणा येईल. असा प्रयोग दिवसात एकदा केल्यास त्याचे फायदे मिळतात.

7. बाजारातील स्क्रबरमुळे तुमच्या त्वचेवर लाल चट्टे उठत असल्यास मध आणि कॉफीचा वापर करून त्वचा स्वच्छ करता येईल.

वरील सर्व प्रयोग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करणे आवश्यक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या