तिरुमला पर्वतावरील शिला तोरणमचे गूढ

आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील तिरुमला देवस्थान हे फक्त हिंदुस्थानातच नाही तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. भदवान तिरुपतींचे दर्शन घेण्यासाठी लाखों भाविक इथे येत असतात. तिरुमला भागातील पर्वतरांगेत शिला तोरणम नावाची एक जागा आहे. ही जागा अद्भुत आणि गूढ प्रकारची आहे.

tirupati-temple

शिला तोरणम हा दगडी कमानीसारखा हा भाग आहे.  पौराणिक कथांमध्ये उल्लेख आढळतो की की देवी-देवता हे पृथ्वीवर प्रकट व्हायचे आणि त्यांना हवे तेव्हा ते अदृश्य व्हायचे. ते अशाच पद्धतीने संपूर्ण ब्रम्हांडात संचार करायचे. काहींनी दावा केला आहे की शिला तोरणम हे एक ताराद्वार (Star Gate) असून याद्वारे एका आकाशंगेगूतन दुसऱ्या आकाशगंगेत जाता येते. याच ताराद्वारातून देवी-देवता भूतलावर यायचे असा अनेकांचा समज आहे.

tirupati-rath-yatra-temple

26 फूट रुंद आणि 10 फूट उंच असलेल्या या दगडी कमानीच्या आसपासच्या परिसरात तीव्र चुंबकीय लहरी उत्सर्जित होत असतात. या भागात गेल्यास मोबाईल, कॅमेरा किंवा बॅटरीवर चालणारी कोणतीही उपकरणे चालत नाहीत. भगवान तिरुपतीचे मंदीर शिला तोरणमपासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर आहे. याच शिला तोरणममधून भगवान विष्णू भूतलावर आले होते अशी अख्यायिका आहे.

shila-toranam-tirumala
जगप्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आईनस्टाईन यांनी आपल्या The Theory of Relativity या सिद्धांतामध्ये दावा केला होता की वेळेचा प्रवास (Time Travel) करणे शक्य आहे आणि त्यांनी त्याचे मार्गही सांगितले होते, ज्याचा वापर करून वेळेचा प्रवास केला जाऊ शकतो. पण यातील अनेक मार्ग केवळ अशक्य आहेत जसे की, जर आपण प्रकाशाच्या गतीने प्रवास केला तर आपण वेळेचा प्रवास (time travel) करू शकतो पण आपण सर्वजण जाणून आहोत की आपले तंत्रज्ञान इतके प्रगत नाही की आपण प्रकाशाच्या वेगाने प्रवास करू शकू.

albert-einstein

याच Theory of Relativity मध्ये आईन्स्टाईन यांनी Worm Hole चा उल्लेख केला आहे. Worm Hole म्हणजे असा मार्ग ज्याद्वारे ब्रम्हांडात अस्तित्वात असणाऱ्या दोन ठिकाणामध्ये प्रवास करता येतो. हा मार्ग अंतराळ आणि वेळ यांच्यातील अंतर कमी करतो म्हणजेच जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचायला आपल्याला जर करोडो वर्षांचा काळ लागत असेल तर त्याहून बऱ्याच कमी वेळेत आपण या worm hole द्वारे पोहचू शकतो. worm hole च्या दरवाजाला ताराद्वार (star gate) असं म्हटलं जातं.

milky-way-galaxy

असा दावा केला जातो की ताराद्वार पृथ्वीवर एकाच ठिकाणी आहे, ते म्हणजे तिरुमला पर्वतरांगेत. स्थानिक लोकं याला “शिला तोरणम” या नावाने संबोधतात. स्थानिक लोकांच्या मते, याच दरवाजातून भगवान विष्णू धरतीवर आले होते. या ताराद्वाराजवळ जायला कोणालाही परवानगी नाही. या शिला तोरणमच्या अवतीभवती सरकारने जाळीचे कुंपण घातले आहे. इथे लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. शिला तोरणमजवळ मोबाईल घेऊन जाण्यास मनाई आहे. काही वर्षांपूर्वी एक पर्यटक मोबाईल घेऊन कुंपण पार करून शिला तोरणमजवळ गेला होता. काही मिनिटांतच तो मृत्यूमुखी पडला होता. डॉक्टरांनी त्याला तपासलं असता त्यांना कळाले की त्याला पेसमेकर बसवला होता आणि तो अचानक बंद पडला होता. अशी दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे.

भू-वैज्ञानिकांचे असे म्हणणे आहे की, दगडांपासून बनलेली अशी रचना जगात अन्यत्र कोठेही नाही. शिला तोरणम हे निसर्गतः बनलेले नसून ही दगडी रचना 2 कोटी वर्षे जुनी असल्याचा दावा केला जातो. पौराणिक कथांमध्ये देवी – देवतांचे एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर जाणे दर्शवले गेले आहे तसेच हिंदू लोकांमध्येही अशी मान्यता आहे की याच शिला तोरणम मधून भगवान विष्णू यांनी पृथ्वीवर प्रवेश केला होता.तिरुमला मंदिरातील भगवान तिरुपतींच्या बाजूला दरवाजासारखी रचना आहे, जी हे दाखवण्याचा प्रयत्न करते की ते कुठल्यातरी दरवाजातून प्रवेश करून आले आहेत. यासंदर्भातील माहिती कोरा या प्रश्नोत्तरांच्या मंचावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.