आगामी बॉण्डपटाची माहिती लीक झाली 

34

सामना ऑनलाईन । लंंडन

जेम्स बॉण्ड या व्यक्तिरेखेवर आधारीत २५ वा चित्रपट येणार असून या चित्रपटाबाबतची माहिती लीक झाली आहे. जेम्स बॉण्डच्या चाहत्यांसाठी ही एक खूषखबर असून या चित्रपटात पुन्हा एकदा डॅनियल क्रेग जेम्स बॉण्डची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट  ‘टूमॉरो नेव्हर डाईज’, ‘द वर्ल्ड इट नॉट इनफ’ आणि ‘डाय अ अनोदर डे’ या कादंबऱ्या लिहणाऱ्या रेमण्ड बेन्सनच्या नव्या कादंबरीवर आधारीत आहे. त्याने २००१ साली ही कादंबरी लिहली होती, जिचं नाव ‘नेव्हर ड्रीम ऑफ डायिंग’ असं होतं.

पुढच्या वर्षी कोएशियामध्ये या चित्रपटाच्या शूटींगला सुरूवात होण्याची अपेक्षा असून हा चित्रपट जपान आणि फ्रान्सच्या दक्षिणी भागात चित्रपटाचा बहुतांश भाग चित्रीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी आलेल्या स्पेक्टर या चित्रपटाचा हा नवा बॉण्डपट पुढचा भाग असणार आहे. या चित्रपटाचं नाव ‘शॅटरहँड’ असं असण्याची शक्यता असून या चित्रपटात जेम्स बॉण्डचा सामना आंधळ्या खलनायकाशी होणार आहे.
या चित्रपटात बॉण्डचे एका विवाहीत तायलीन मॅग्नॉन नावाच्या अभिनेत्रीसोबत प्रेमसंबंध जुळतात आणि बॉण्डला या अभिनेत्रीच्या नवऱ्याचे ‘द युनियन’ या गुन्हेविश्वातील कुख्यात टोळीशी संबंध असल्याचं कळतं. ही या चित्रपटाची कथा असल्याचं सांगण्यात येत आहे. स्पेक्टरमध्ये  जेम्स बॉण्डने मुकाबला केलेलं फ्रान्ज ओबरहाऊजर हे पात्र या चित्रपटात पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे. त्याच्या जोडीला डेव्ह बतिस्तादेखील चित्रपटात बघायला मिळणार आहे.

या चित्रपटासाठी सॅम मेन्डीस यांच्याजागी नव्या दिग्दर्शकाची चाचपणी सुरू असल्याचं कळतंय. सॅम मेन्डीसच्या जागी  यान डेमाग, डेव्हिड मॅकेन्झी आणि डेनिस विलेन्यूव्ह या तिघांपैकी एकाचं नाव निश्चित होण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या