‘चि. व. चि. सौं. का.’चं अकापेला स्टाईलचं शीर्षकगीत

सामना ऑनलाईन । मुंबई

झी स्टुडियोज प्रस्तुत आणि निखिल साने निर्मित ‘चि. व. चि. सौ. का.’ या चित्रपटाच्या धमाल ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळतोय. आता या चित्रपटाचं शीर्षकगीतही नुकेतच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आलं आहे. ‘चि. व चि. सौ. का.’ हे अकापेला धाटणीचं गीत आहे. अकापेला म्हणजे गाण्यात कोणतेही वाद्य न वापरता वाद्यांचे आवाज फक्त तोंडाने काढलेलं गाणं. अभिनेते आणि गीतकार स्वानंद किरकिरे यांनी हे गीत गायलं आहे.

या गाण्याला नरेंद्र भिडे यांनी यांचं संगीत लाभलं असून परेश मोकाशी यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. झी स्टुडिओज निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित सत्यप्रकाश-सावित्रीचा हा ‘लग्नसुडोकू’ मधुगंधा कुलकर्णीच्या लेखणीतून साकारला आहे. झी स्टुडिओज् चे निखिल साने यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांची कथा, पटकथा आणि संवाद असलेल्या या चित्रपटात मृण्मयी गोडबोले, ललित प्रभाकर, सुप्रिया पाठारे, प्रदीप जोशी, पुर्णिमा तळवलकर, सुनील अभ्यंकर, शर्मिष्ठा राऊत, पुष्कर लोणारकर, भारत गणेशपुरे, ज्योती सुभाष आणि सतीश आळेकर अशी कलाकारांची मांदियाळी आहे. ‘चि. व चि. सौ. कां.’ हा सिनेमा येत्या १९ मे २०१७ ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

आपली प्रतिक्रिया द्या