रेतीमाफियांना पोलिसांचा पाठबळ ? स्टेशन डायरिवरी व्हायरल

17
प्रातिनिधिक छायाचित्र

सामना ऑनलाईन । टिटवाळा

रेतीमाफियांचे महसूल अधिकारी आणि पोलिसांबरोबर साटंलोटं असल्याचे आरोप होताना आपण नेहमीच बघतो. मात्र टिटवाळा येथील घडलेल्या धक्कादायक प्रकार समोर आल्यावर रेतीच्या अवैध धंद्याला पोलिसांचा पाठबळ असल्याचे निदर्शनास आले आहे.

सध्या सोशल मीडियावर एक स्टेशन डायरीवरील नोंद व्हायरल होत आहे. यामध्ये अवैध रेतीच्या गाड्यांवर कारवाई करण्यावरून टिटवाळा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांमध्ये आपापसातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

titwala-diry

टिटवाळा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी राजेश खोपकर यांनी बेकायदेशीरपणे रेतीची वाहतूक करणारे तीन ट्रक पकडले, मात्र त्यांचे वरिष्ठ अधिकरी संजय धुमाळ यांनी त्यांना फोन करून “सदर गाड्या सोडुन द्या, प्रकरण वाढवू नका, ह्या गाड्या डी वाय एस पीं च्या बांधलेल्या आहेत, मी सांगतो तुम्ही सोडून द्या” असे सांगितले. याबाबत राजेश खोपकर यांनी स्टेशन डायरी मध्ये फोनवरील झालेल्या संभाषणाची जशीच्या तशी नोंद केली आहे. त्यामुळे हा वाद चांगलाच रंगला. विशेष म्हणजे स्टेशन डायरीवरील नोंदीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे टिटवाळा पोलिसांनी सारवासारव करण्यास सुरुवात केली आहे .

आपली प्रतिक्रिया द्या