तृणमूलच्या आमदाराने राजदंड पळवला,त्रिपुरा विधानसभेत गोंधळ

40

त्रिपुरा विधानसभेमध्ये आज प्रचंड गोंधळादरम्यान लोकशाहीला लाजववणारा प्रकार घडला. तृणमूल काँग्रेसच्या एका आमदाराने राजदंड उचलला आणि ते सदनाबाहेर पळून गेले. सुदीप रॉय बर्मन असं य आमदाराचं नाव आहे. चर्चेच्या मागणीस नकार दिल्यानं या आमदाराने राजदंड पळवला. सदनातील मार्शल त्यांना नियंत्रित करेपर्यंत त्यांनी सभागृहाबाहेर धूम ठोकली होती.

त्रिपुराचे वनमंत्री नरेश जमातिया यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप आहे. त्यांच्या सेक्स स्कँडलबाबत सदनात चर्चा व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. विधानसभेच्या अध्यक्षांनी चर्चेस नकार दिला, ज्यामुळे सुदीप बर्मन संतापले होते. याआधी याच सभागृहातून राजदंड पळवल्याची ५ घटनांची नोंद आहे,त्यात आजच्या घटनेनं भर पडली आहे
जमातिया यांनी एका ७ वर्षांच्या मुलीचा लैंगिक छळ केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आगरतळाचे नगरसेवक मृतमन सेन यांच्यावरही या सेक्स स्कँडलमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. सेन यांना पोलिसांनी अटक केली होती मात्र नंतर त्यांना जामीन मिळाला.
त्रिपुरा विधानसभेत शून्य प्रहरादरम्यान जबरदस्त गोंधळ सुरू झाला होता. च्या सेक्स स्कँडलबाबत चर्चेची मागणी विरोधक करत होते, विरोधकांनी आक्रमक भुमिका घेत जमातिया आणि मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्याचदरम्याम बरमन हे राजदंड घेऊन पळून गेले. नंतर मार्शल्सनी राजदंड परत मिळवला आणि पुन्हा अध्यक्षांसमोर सन्मानाने ठेवला. या घटनेबद्दल विधानसभा अध्यक्ष देबनाथ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राजदंड पळवणारे बरमन ज्या पक्षाचे त्या पक्षाच्या म्हणजेच तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनीही देखील घडल्याप्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या