
बनावट ट्विटप्रकरणी गुजरात पोलिसांनी टीएमसी प्रवत्ते साकेत गोखले यांना दुसऱयांदा अटक केली आहे. गोखले यांना याआधी एका गुह्याखाली अटक झाली होती. त्यांची आज पोलीस कोठडी संपल्याने न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. त्यानंतर गुजरात पोलिसांनी तत्काळ बनावट ट्विटप्रकरणी अटक केल्याचे क्राईम ब्रँचचे एसीपी जितेंद्र यादव यांनी सांगितले. तर पोलिसांची ही कारवाई गोखले यांना त्रास देण्यासाठीच असल्याचे ट्विट डेरेक आ ब्रायन यांनी केला आहे.