दिवा, मुंब्रा येथे टीएमटीचे टर्मिनस उभारा!

55

शिवसेनेची मागणी
ठाणे– दिवा व मुंब्रा येथे दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असून दोन्ही ठिकाणी परिवहन सेवेचे टर्मिनस उभारण्यात यावे अशी मागणी शिवसेनेने केली आहे. महानगरपालिकेच्या राखीव भूखंडावर हे टर्मिनस उभारल्यास त्याचा लाखो प्रवाशांना फायदा होणार आहे. याबाबत परिवहन व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले असून प्रकल्प अहवाल लवकरात लवकर तयार करावा अशी विनंती केली आहे.

दिवा शहर झपाट्याने विकसित होत असून या भागातून हजारो विद्यार्थी प्रवास करीत असतात. दिवा हे रेल्वेचे जंक्शन स्थानक असून या भागातून ठाणे स्टेशन, डोंबिवली, वाशी, पनवेल आदी मार्गांवर परिवहनची सेवा सुरू करता येणे शक्य होणार आहे. याबाबत प्रशासनाने प्रवाशांची गरज लक्षात घेऊन दिवा तसेच मुंब्रा येथे टर्मिनस उभारावे अशी लाखो प्रवाशांची मागणी आहे. मुंब्रादेखील दिवसेंदिवस विकसित होत असून परिवहन अधिकार्‍यांनी भविष्यकाळाची गरज लक्षात घेऊन आतापासूनच टर्मिनस उभारण्याबाबत कार्यवाही सुरू करावी अशी मागणी शिवसेनेचे परिवहन सदस्य राजेंद्र महाडिक यांनीं केली आहे. परिवहनच्या बैठकीतदेखील त्यांनी टर्मिनस उभारण्याबाबत आग्रह धरला असून त्यास काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाच्या सदस्यांनीदेखील पाठिंबा दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या