हायवेलगत दारुबंदीमुळे कोल्हापुरात दुकानासमोर मंडप घालून दारूची विक्री

35

सामना ऑनलाईन, कोल्हापूर

सर्वोच्च न्यायालयाने महामार्गालगतच्या दारूच्या दुकानांवर, बारवर बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. मात्र लांबचा वळसा घालत दारूप्रेमींनी दुसरी दुकाने पालथी घालायला सुरूवात केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कोल्हापुरात एका दुकानाबाहेर अचानक गर्दी वाढायला लागली. ही गर्दी आवरत नसल्याने या दुकानमालकाने दुकानाबाहेर मंडप घातला, मंडपामध्ये मॉलमध्ये प्रदर्शनी भागावर ठेवतात तशा दारूच्या बाटल्या मोठाल्या पातेल्यांमध्ये थंड पाण्यात भरून लोकांसमोर मांडल्या. त्यामुळे इथली गर्दी आणखीनच वाढली.

liquor-mandap-in-kolhapur-p

 

कोल्हापुरातील अत्यंत प्रसिद्ध अशा ताराबाई पार्कध्ये स्कॉच हाऊस हे दुकान आहे. तिथे इतकी गर्दी झाली की अखेर पोलिसांकडे त्याची तक्रार करण्यात आली. पोलीस तिथे आले आणि त्यांनी अखेर या दुकानावर कारवाई केली. ही घटना पाहणाऱ्या कोल्हापूरकरांना दारूसाठी लोकं काहीही करू शकतात याचा प्रत्यय आला.

 

आपली प्रतिक्रिया द्या