लसीकरणाचा वेग मंदावल्यामुळे ऑलिम्पिकवर संकट

जपानमधील टोकियो शहरात ऑलिम्पिकचे आयोजन जुलै ते ऑगस्ट या कालावधीत करण्यात येणार आहे. सध्या जगभरात कोरोना वाढू लागला आहे. जपानमध्येही याचा कहर दिसून येत आहे, पण या देशात लसीकरणाचा वेग मंदावला आहे. तसेच टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंनी लसीसाठी आग्रहही धरलेला नाही. या कारणामुळे टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजनावर संकट कोसळले आहे. टोकियो येथील आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले की, टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आल्यास प्रेक्षकांविना हा क्रीडा महोत्सव पार पडेल.

आपली प्रतिक्रिया द्या