BREAKING – कोरोनाचा फटका, ‘टोकियो ऑलिम्पिक- 2020’ एक वर्ष लांबणीवर

कोरोना विषाणूचे पडसाद क्रीडाविश्वातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकवरही पडले आहेत. जीवघेण्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर टोकियो ऑलिम्पिक हा मानाचा क्रीडा महोत्सव एक वर्ष लांबणीवर गेला आहे. टोकियो ऑलिम्पिक कार्यकारी समितीतील अधिकारी हारूयुकी ताकाहाशी आणि जपान प्रशासनाने याबाबत माहिती दिली आहे.

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावमुळे अनेक देशांनी जपानमध्ये खेळण्यास नकार दिला होता. तसेच अनेक प्रमुख खेळाडूंनी देखील सहभागी होणार नाही असे स्पष्ट सांगितले होते. त्यामुळे जपान सरकार आणि ऑलिम्पिक समितीला अंतिम निर्णय घ्यावा लागला.

screenshot_2020-03-24-18-49-34-552_com-twitter-android

अर्थव्यवस्था कोलमडणार

टोकियो ऑलिम्पिकसाठी आयोजकांकडून आतापर्यंत 1.35 ट्रिलियन येन इतका खर्च करण्यात आला आहे. याशिवाय या स्पर्धेच्या स्पॉन्सर्सशिपसाठी निरनिराळ्या कंपन्यांसोबत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून करार करण्यात आलेला आहे. यामध्ये जपानमधील टोयोटो, ब्रिजस्टोन व पॅनासोनिक या कंपन्यांचा समावेश आहे. टोकियो ऑलिम्पिक पुढे ढकलण्यात आल्याने जपानची अर्थव्यवस्था कोलमडणार हे निश्चित आहे.

फुटबॉल, बास्केटबॉल स्पर्धांचा अडथळा

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे टोकियो ऑलिम्पिक एक वर्ष पुढे ढकलण्यात आले आहे. मात्र यामुळे समस्या संपलेली नाही. कारण पुढल्या वर्षी फुटबॉल, बास्केटबॉलच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळवण्यात येणार आहेत. याचा अडथळा ऑलिम्पिकमध्ये येऊ शकतो.

पर्यटनावरही होणार परिणाम

टोकियो ऑलिम्पिक पुढे ढकलण्यात आल्याने जपानच्या पर्यटनावरही मोठा परिणाम होणार आहे. कोरोना विषाणूमुळे जपानमध्ये पर्यटनास कोणीही जाण्यास तयार नाही. टोकियो ऑलिम्पिक पुढे ढकलण्यात आल्याने जपानचा पाय आणखीनच खोलात जाणार आहे. तसेच नव्याने उभारण्यात येणाऱ्या स्टेडियमच्या निर्मितीलाही याचा फटका बसणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या