चक दे इंडिया! ब्रिटनला मात देत पुरुष हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये धडक

आठ वेळची ऑलिम्पिक चॅम्पियन असणाऱ्या हिंदुस्थानच्या पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये झोकात प्रवेश केला आहे. रविवारी सायंकाळी झालेल्या क्वार्टर फायनल लढतीत हिंदुस्थानने ग्रेट ब्रिटनचा 3-1 असा दणदणीत पराभव केला. या विजयासह तब्बल चार दशकानंतर पुरुष हॉकी संघ सेमीफायनलला पोहोचला आहे. सेमीफायनलमध्ये हिंदुस्थानचा सामना बेल्झियमच्या संघाशी होणार आहे.

हिंदुस्थानच्या हॉकी संघाने पहिल्या क्वार्टरपासून ब्रिटनच्या संघावर दबाव टाकला. याचा फायदा हिंदुस्थानला सातव्या मिनिटाला झाला. दिलप्रीत सिंग याने शानदार गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरच्या पहिल्या मिनिटालाच गुरजंत सिंह याने गोल करत हिंदुस्थानची आघाडी 2-0 अशी केली. मध्यांतरापर्यंत हिंदुस्थानने ही आघाडी कायम राखली.

पी.व्ही. सिंधूने इतिहास रचला, टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकावर मोहोर

तिसऱ्या क्वार्टरमध्ये ब्रिटनने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. अखेरच्या काही क्षणांमध्ये सॅम्यूयल इयान याने गोल करत ही आघाडी 1-2 अशी कमी केली. यानंतर चौथ्या क्वार्टरमध्ये हार्दिक सिंग याने मैदानी गोल करत हिंदुस्थानला 3-1 आघाडी मिळवून दिली. अखेरच्या क्षणापर्यंत ही आघाडी कायम राखत हिंदुस्थानने सेमीफायनल गाठली.

1980 नंतर कामगिरी घसरली

ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानच्या हॉकी संघाला अखेरचे पदक 1980 ला रशियातील मॉस्को शहरात झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत मिळाले होते. वासुदेवन भास्करन यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हिंदुस्थानच्या संघाने तेव्हा सुवर्णपदकावर मोहोर उमटवली होती. मात्र तेव्हापासून हिंदुस्थानचा संघ एकदाही सेमीफायनलसाठी पात्र ठरला नव्हता. 1984 ला अँजिलिस ऑलिम्पिकमधील पाचवे स्थान ही हिंदुस्थानची सर्वोत्तम कामगिरी होती. मात्र यंदा हिंदुस्थानच्या हॉकी संघाने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन घडवत सेमीफायनलमध्ये गाठली.

Tokyo Olympic विजयी होऊनही ‘हा’ बॉक्सर स्पर्धेतून बाहेर, जाणून घ्या नक्की काय घडलं

पाच पैकी चार विजय

मनदीप सिंगच्या नेतृत्वाखाली खेळताना साखळी लढतींमध्ये हिंदुस्थानच्या हॉकी संघाने दमदार खेळ केला. पाच पैकी चार विजय मिळवत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. तर दुसरीकडे ब्रिटनने दोन विजय, दोन पराभव आणि एका ड्रॉ सह क्वार्टर फायनल गाठली होती. मात्र क्वार्टर फायनलमध्ये हिंदुस्थानपुढे आक्रामक खेळापुढे ब्रिटनची डाळ काही शिजली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या