मिराबाई चानूला मिळू शकत सुवर्णपदक, चिनी खेळाडूची होणार डोप टेस्ट

टोकियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानच्या खात्यात पहिले सुवर्णपदक येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वेटलिफ्टिंगमध्ये (49 किलो गटात) रौप्यपदक जिंकणारी मिराबाई चानूचे हे पदक सुवर्णात बदलू शकते. वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारी चीनची खेळाडू झीयू हौ हिची डोपिंग टेस्ट होणार असल्याची बातमी समोर आल्यानंतर ही चर्चा रंगली आहे.

डोपिंग टेस्टमध्ये जर झीयू हौ पॉझिटिव्ह आढळ्यास दुसऱ्या क्रमांकावर विजेती राहिलेल्या मिराबाईचे मेडल अपडेट करत तिला सुवर्णपदक दिले जाऊ शकते. असं झाल्यास वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारी मिराबाई चानू ही पहिली हिंदुस्थानी खेळाडू ठरणार आहे.

दरम्यान, 26 वर्षीय मीराबाई चानू हिने वेटलिफ्टिंग या खेळातील महिलांमध्ये 49 किलो वजनी गटात 202 किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकले आहे. हिंदुस्थानचे टोकियो ऑलिम्पिकमधील हे पहिले पदक ठरले. हिंदुस्थानला तब्बल 21 वर्षांनंतर वेटलिफ्टिंग या खेळामध्ये पदक जिंकता आले. याआधी करनम मल्लेश्वरी हिने 2000 सिडनी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले होते.

आपली प्रतिक्रिया द्या