Tokyo olympic – भालाफेकमध्ये नीरज चोप्राची जबरदस्त कामगिरी, पहिल्या प्रयत्नात गाठली फायनल

टोकयो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने जबरदस्त कामगिरी केली आहे. फालाफेकमधील अ गटातील स्पर्धेत नीरजने पहिल्याच फेरीत सर्वोत्तम कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. नीरजने 83.50 मीटरपेक्षा लांब भाला फेकला आहे. त्यामुळे आता नीरजकडून पदकाच्या अपेक्षा वाढल्या आहेत.


पुरुष भालाफेक स्पर्धेत 83.50 मीटरपर्यंत भाला फेकणाऱ्या स्पर्धकाला किंवा सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 12 खेळाडूंना प्रवेश अंतिम फेरीत प्रवेश दिला जातो. अ व ब गटातून प्रत्येकी 12 खेळाडू निवडले जातात. अ गटाची स्पर्धा सुरू झाल्यानंतर नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 86.50 मीटर अंतरावर भाला फेकल्याने तो थेट अंतिम फेरीत पोहोचला आहे. नीरज चोप्राची अंतिम फेरी 7 ऑगस्ट रोजी होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या