Tokyo Olympic – विनेश फोगटच्या झंजावातासमोर स्वीडनची कुस्तीपटू भुईसपाट, विजयामुळे उपांत्यपूर्व फेरीत धडक

कुस्तीपटू विनेश फोगटने गुरुवारची सुरुवात गोड बातमीने केली. स्वीडनच्या सोफिया मॅगगडेलेनासोबत तिचा आज मुकाबला होता. या मुकाबल्यामध्ये तिच्या झंजावाती खेळापुढे सोफिया पार निष्प्रभ ठरली. हा सामना विनेशने 7-1 असा जिंकत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.

Photo – ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानसाठी पदक आणणारे कुस्तीपटू

आपल्या मुलीचा सामना पाहण्यासाठी प्रेमलता फोगाट या टीव्हीसमोर ठाण मांडून बसल्या होत्या. विनेशच्या विजयानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला. विनेशने चांगला खेळ केला असून मी खूप आनंदी आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

हिंदुस्थानी नेमबाज व तिरंदाजांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये निराशा केली असली तरी कुस्तीपटूंनी फ्री स्टाईल प्रकारात अपेक्षित कामगिरी केली आहे. रवीकुमार दहियाने 57 किलो गटात अंतिम फेरी गाठली असून त्याने देशाचे ऑलिम्पिकधील चौथे पदक पक्के केले आहे. तो गुरुवारी सुवर्ण पदकासाठी आखाडय़ात जिवाचे रान करताना दिसेल. दुसरीकडे दीपक पुनियाचा उपांत्य लढतीत पराभव झाला. मात्र त्याच्याकडून देशाला आता कास्य पदकाची आशा लागली आहे.

Video – पाहा रवी दहियाचा ‘चितपट’ डाव

महिला कुस्तीपटू अंशू मलिक हिलाही 57 किलो वजनी गटात रेपचेज फेरीतून कास्य पदक जिंकण्याची संधी होती, मात्र तिला या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. गुरुवारी हॉकी संघ कास्य पदकासाठी जर्मनीशी भिडणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या